सुख दुःख
हरपले मानवाने भान
हरपले मानवाने भान
सुखांसाठी खोदतो तो दुःखाची खाण
हरपले मानवाने भान
नकळत की जाणून बुजून
नकळे करतो असे का म्हणून?
खरकटे झाले पापाने हात मानवाचे
धुवायला न मिळे पाणी शुध्द गंगेचे
डुबकी मारून बसलास दुखसागरात
घे भरारी एकदा तू सुखाच्या आकाशात
आपोआप मिळेल सारी सुख शांती जगाची
भासणार ना उणीव तुजला शुल्लक सुखांची
उतुंग भरारी घे तुझ्या आयुष्यात
दुःखावर कर हिमतीने तू मात
सुखाच्या मोहात माणसे फसतात फसवतात
मोठं सुख मिळवण्यासाठी कोटी सुखे जोडायची असतात.
- ओंकार थोरात
05.07.2014
50 views